73 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची 73 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन येथे आयोजित केली होती.  

सभेच्या कामकाजास ठिक 4.30 वाजता सुरवात झाली.  सर्वप्रथम अहवाल सालात दिवंगत झालेले कांही मान्यवर सभासद,त्यांचे नातेवाईक,कला,क्रिडा, सामाजिक,साहित्य,राजकीय तसेच सिमेवरील शहीद जवांनाना सर्व उपस्थितांनी उभेराहून श्रध्दांजली वाहीली.
त्यानंतर मानद अध्यक्ष श्री.रणजीत शाह यांनी प्रास्तावीक आणि स्वागत करून अहवाल सालातील कार्याचा आढावा सादर केला, तसेच भविष्यातील नियोजित उपक्रमाची आणि कार्याची माहिती दिली. तसेच मोफत उर्जा परिक्षण करणेसाठी आणि शुध्द पाणी मिळणेसाठीचे वाॅटर एटीएम कार्डसाठी नांव नोंदणी सभासदांनी करावी असे आवाहन केले. त्यानंतर विषय पत्रिकेतील विषयाप्रमाणे वाचन होवून सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
आयत्यावेळच्या विषयावर विज दरवाढीच्या प्रश्नावर सर्व संघटनांनी एकत्रित येवून कोर्टात केस दाखल करण्याचे ठरले.  तसेच ईएसआय विषयी प्रखरपणे मालक आणि कामगार यांनी भूमिका घेवून हा विषय सोडविला पाहिजे असे ठरले.
संचालक आणि उद्यमवार्ताचे मुख्य संपादक श्री.नितीन वाडीकर यांनी उद्यमवार्ता कार्याचा आढावा घेवून जाहीराती देवून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
आभार प्रदर्शन मानद सचिव श्री.दिनेश बुधलेसोा यांनी केले आणि सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात संपलेचे जाहीर केले.  सूत्रसंचालन सचिव श्री.प्रदीप व्हरांबळे यांनी केले.  शेवटी राष्ट्गीत म्हणून सभेचे कामकाज समाप्त झाले.

यावेळी सर्वश्री.रणजीत शाह,हर्षद दलाल, दिनेश बुधले, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, अतुल आरवाडे, श्रीकांत दुधाणे, संजय अंगडी, नितीन वाडीकर, बाबासोा कोेंडेकर, जयदीप मांगोरे, अभिषेक सावेकर, सोहन शिरगावकर,शांताराम सुर्वे, सुभाष चव्हाण, चंद्रकांत चोरगे, अशोकराव जाधव, सुरेश मंडलीक, सुर्यकांत खोत, जयराजभाई वसा, मुबारक शेख, तानाजी उंडाळे, नरेंद्र माटे, पृथ्वीराज कटके, हिंदूराव कामते इ.उपस्थित होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur