अस्थिर काळातील धोके ओळखून ते वेळीच कमी करा- मल्लीका श्रीनिवास.

 

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात टॅफे ट्ॅक्टरच्या अध्यक्षा व कार्यकारी संचालिका मल्लीका श्रीनिवासन यांनी अस्थिर काळातील अभियांत्रिकी उद्योगांचे नेतृत्व या विषयावर उद्योजकांना मार्गदर्शन केले.

आताचा काळ उद्योजकांनी समजून घेतला पाहिजे.  जगभरातील उद्योगांमध्ये सध्या अस्थिर वातावरण आहे.  अस्थिरता, अनिश्चितता, गंुतागंुत, अस्पष्टता या चार गोष्टीवर त्यांनी भर दिला आणि याबाबत त्यांनी आज मार्गदर्शन केले.  जगभरात चीन वरील विश्वास अलिकडील काळात कमी झाला असून चीनवर जग अवलंबून राहू शकत नाही.  त्यामुळे भारतातील व खास करून कोल्हापूर करांनी ही संधी समजून याचा फायदा येथील उद्योगांनी घेतला पाहिजे.  महागाई वाढत आहे याबाबत दुमत नाही.  परंतु जगभरांमध्ये कारखान्यांचे खर्च वाढले आहेत.  मालमत्तेवरील खर्च कमी करणे, कर्ज कमी कमी करित जाणे यामुळे वरील चार अस्थिर गोष्टीतून उद्योग नक्की बाहेर पडतील.  स्वातंत्रपुर्व काळापासून ते आज पर्यंत बदलत असलेल्या उद्योग जगताचा आढावा घेतला.  त्याचप्रमाणे उद्योग जगतातील अडचणीवर मात करण्यासाठीचा मॅजिक मंत्रा अर्थात सुसंवाद, निर्णयक्षमता, अभ्यास आणि नैतिकता या गोष्टींना महत्व असल्याचे सांगितले.  एखाद्या गोष्टीत गंुतवणूक करण्यापेक्षा ती भाडयाने घेवून काम होवू शकेल का ? किंवा अगदीच आवश्यक असलेली गंुतवणूक करून अनावश्यक गंुतवूणक टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला.  यावेळी त्यांनी महाराष्ट्ात विशेषतः कोल्हापूरात काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगत येत्या येत्या काळात याचा नक्की  विचार करू असे आश्वासन दिले.  कोल्हापूरचा औद्योगिक विकास आणि येथील पुर्वीच्या लोकांनी उद्योगवाढी केलेले कार्य पाहून मी भारावून गेले आहे असे नमूद केले. 

आपल्या मनोगतात पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथील औद्योगिक कार्याची माहिती दिली व टॅफेचा यापुढील उद्योग विस्तार कोल्हापूरात करण्याचे आवाहन मल्लीका श्रीनिवास यांना केले.  तसेच कोल्हापूरातील विमान तळास नाईट लॅण्डींगसाठी तत्वतः मंजूरी मिळाल्याची माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी जगातील बदलत्या परिस्थतीचा सविस्तर आढावा घेवून भारतीय उद्योग क्षेत्रात आवश्यक असलेलेले टॅलंेट परदेशात जाण्यापासून रोखू शकतो असा विश्वास व्यक्त केला.

यापुर्वी अध्यक्ष श्री.सचिन मेनन यांनी प्रास्ताविक भाषणात औद्योगिक पुर्व काळापासून केलेल्या औद्योगिक प्रगतीचा आढावा सादर केला.  व संस्थापकांनी, सभासदांनी या संस्थेत केलेल्या कार्यामुळेच आजचा अमृत महोत्सवी साजरा होत असलेचे सांगितले.  शाहू महाराजांच्या हस्ते असोसिएशने अमृत महोत्सवा निमित्त औद्योगिक प्रगतीचा प्रवास असलेली स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आलेे.   मुख्य संपादक व संचालक श्री.नितीन वाडीकर यांनी या स्मरणिकेबाबतची माहिती दिली.  प्रमुख पाहुण्या मल्लीका श्रीनिवास यांच्या हस्ते श्री.हिंदूराव कामते, स्व.सुरेश उर्फ बापूसो तेंडूलकर, श्री.शंकरराव लोहार यांना उद्योगश्री पुरस्कार देवून गौरविण्यात आले,तर स्वर्गीय तुकाराम दत्तात्रय कुलकर्णी यांना जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले हा पुरस्कार त्यांचे चिरंजीव श्री.कमलाकांत,नातू गिरिश यांनी स्विकारला.  यावेळी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या प्रगतीचा इतिहास दाखविणारी चित्रफित दाखविण्यात आली.  मल्लीका श्रीनिवास यांचा असोसिएशन तर्फे मल्लीका श्रीनिवास यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ, स्मृती चिन्ह,महालक्ष्मीचा प्रतिमा देवून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.  तसेच येथील औद्योगिक संघटना महाराष्ट् चेंबर ऑफ कॉमर्स मुंबईचे अध्यक्ष श्री.ललीत गांधी, स्मॅकचे अध्यक्ष श्री.दिपक पाटील,गोशिमाचे अध्यक्ष श्री.मोहन पंडितराव, मॅक-कागलचे अध्यक्ष श्री.संजय पेंडसे, सीआयआयचे अध्यक्ष श्री.रवि डोली, को.उद्यम सोसायटीचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत चोरगे, को.चेंबरचे अध्यक्ष श्री.संजय शेटे, केआयटीचे अध्यक्ष श्री.सुनिल कुलकर्णी यांचे हस्ते मल्लीका श्रीनिवास यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.  आभार प्रदर्शन श्री.दिनेश बुधले यांनी केले.

यावेळी उद्योग क्षेत्रतील नामवंत उद्योजक उपस्थित होते.  यामध्ये बाबाभाई वसा, हर्षद दलाल,दिनेश बुधले,प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, श्रीकांत दुधाणे,रणजीत शाह, संजय अंगडी, नितीन वाडीकर, बाबासो कोंडेकर, अतुल आरवाडे, अमर करांडे, जयदिप मांगारे, अभिषेक सावेकर, किरण पाटील, सोहन शिरगावकर,सचिन शिरगावकर,सुरेंद्र जैन,आनंद माने, आर.बी.थोरात, प्रकाश चरणे, एम.वाय.पाटील, शिवाजीराव पोवार, बाबुभाई हुदली, शाम देशिंगकर, पद्माकर सप्रे, प्रदीपभाई कापडिया, संजय पाटील,आनंद देशपांडे,भरत जाधव, दिपक जाधव,निरंजन मेहता,दिपक मिरजे,शाम तोतला इ.उपस्थित होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur