यशस्वी व्हायचे असेलतर त्या क्षेत्रातील आवड जोपासा-प्रा.एम.बी.सावंत

विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हायचे असेलतर ज्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे आहे त्या क्षेत्रातील आवड जोपासा तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल असे प्रतिपादन प्रा.एम.बी.सावंत यांनी केले.  ते कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनने अमृत महोत्सवा निमित्त आयोजित केलेल्या ‘‘ विद्यार्थ्यांचे भविष्यातील ध्येय आणि उद्देश या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होते.

     अभ्यास कोणासाठी करता हे तपासून पहा, नकारात्मक विचार काढून टाका, आयुष्यात यापुर्वी आलेली निराशा झटकून टाका. स्वतःवर प्रेम करणे आपला हक्क आहे,त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, स्वतःचे कौतुककरा आणि ध्येय गाठण्यासाठी ‘‘ हो मी करू शकतो असा ठाम आत्मविश्वास निर्माण करा.  तुमचे मन प्रज्वलीत करून स्वतःला उद्दीग्त करा.  प्रत्येक गोष्टीचे निरिक्षण करा, त्यातून शिका आणि योग्य प्रकारे अंमलबजावणी करा.

     यशस्वी होण्यासाठी तुमचे रंगरूप कसेही असूदे त्यामुळे फरक पडत नाही.  स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी मी पुरेसा आहे असे आपल्या मनाला ठामपणे सांगा.  आपण आनंदी राहणे आणि आरोग्यदायी असणे सर्वात महत्वाचे आहे.

ब-याच जणांना ध्येय म्हणजे काय हेच माहित नसते, आपल्या आयुष्यात जे आपल्याला करावयाचे आहे तेच ध्येय होय.  तसेच उद्देश म्हणजे ध्येय गाठण्यासाठी केलेले आपल्या कामाचे छोटे,छोटे भाग करा.  सर्वप्रथम इच्छा व्यक्त करा, ते करण्यासाठी नियोजन करा, त्यांची अंमलबजावणी करा आणि ध्येय गाठण्यात यशस्वी व्हा असा मूल मंत्र प्रा.सावंत यांनी दिला. या जगात पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा आपल्या तब्येतीने आरोग्यदायी आहे तोच खरा श्रीमंत म्हणावा लागेल. 

     या जगाता अनेक क्षेत्रात संधी आहेत त्या वेळीच ओळखा.  वाया जाणारी शक्तीचे निरिक्षण करा, आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल केल्यास आपल्याला ध्येय लवकर मिळेल यात शंका नाही.  चुकीचे नियोजन करू नका, ध्येयाकडे सातत्यपुर्ण लक्ष देवून तुमची वाटचाल सुरू ठेवा.  गरजेपेक्षा जादा शक्ती वापरणे किंवा कमी वापरणे हेही चुकीचे असून योग्य शक्ती वापरून निश्चीत ध्येय गाठा.

     तरूण वयात कष्ट केल्यास उर्वरित आयुष्य सुखकर होईल अन्यथा म्हातारपणातही कष्ट करावे लागतील.  जर चालत राहीलातर संपुर्ण जग तुमचे आहे परंतु झोपून राहीलातर कांही कालावधीनंतर ज्या चटईवर झोपला आहात ती चटईसुध्दा तुमचा तिरस्कार करेल हे लक्षात ठेवा.

     विद्यार्थी आज्ञाधारक पाहिजे, प्रामाणिक पाहिजे व कष्ट करणारा असला पाहिजे.  सकारात्मक आणि नकारात्मक बाबींचा योग्य संतुलन ठेवा, नकारात्मक गोष्टी कमी करून सकारात्मक बाबी वाढवा अश्या प्रकारे प्रा.एम.बी.सावंत यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी त्यांनी पॉवर पॉईंट प्रझेनटेशनव्दारे तसेच व्हीडीओ फिल्मव्दारेही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

     व्याख्यानाच्या सुरतावातीस अध्यक्ष श्री.हर्षद दलालसोा यांनी प्रास्ताविक व स्वागत केले व प्रमुख पाहुण्यांचे शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.  पाहुण्यांची ओळख सेक्रेटरी व टेªझरर श्री.कमलाकांत कुलकर्णी यांनी करून दिली, आभार प्रदर्शन जॉ.सेक्रेटरी श्री.प्रसन्न तेरदाळकर यांनी केले, सुत्रसंचालन श्री.प्रदीप व्हरांबळे यांनी केले. 

     यावेळी सर्वश्री.हर्षद दलाल, दिनेश बुधले, कमलाकांत कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळकर, नितीन वाडीकर, कुणाल दलाल, यशव्ही वसा, प्रा.ओ.एस. मालंडकर, अशिष जाधव, मेघा धनवडे, मकरंद सावंत, आरती कणिरे, संजय खाडे, सिध्दार्थ चव्हाण, अमोल कुलकर्णी, सचिन पुजारी, गुरूप्रसाद पाटील, प्रशांत अतिग्रे, सुराली पवार, संजय पवार, शैलेश पुरोहीत, वझीर मोमीन, सुहास मुळे, ए.जे. बागवान, अर्थव कदम, सुयश मुळे, ए.एस.सुुर्यवंशी, जोहर मोमीन, अब्दुलगणी मुल्लाणी, युनुस मुल्लाणी, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे, तुषार सुतार, राम कंुभार, भगवान मुडळे, अमित सरंजामे,भगवान माने इ. उपस्थित होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur