Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u914847794/domains/keaindia.org/public_html/include_db.php on line 46
Events - Kolhapur Engineering Association - Promoting Healthy Growth & Development of Industries

कोल्हापूर इंजि.असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री.हर्षद दलाल तर

उपाध्यक्षपदी श्री.दिनेश बुधले यांची निवड.

 

कोल्हापूर दि.24ः येथील कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा आज संपन्न झाली.  या सभेत कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री.हर्षद दलाल यांची तर उपाध्यक्षपदी श्री.दिनेश बुधले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.  सचिव व खजाणिस या दोन्हीपदी श्री.कमलाकांत कुलकर्णी यांची, सहसचिवपदी श्री.प्रसन्न तेरदाळकर यांची निवड करण्यात आली.  स्विकृत संचालक म्हणून श्री.जयदिप मांगोरे आणि श्री.सोहन शिरगावकर यांची निवड करण्यात आली.

असोसिएशन तर्फे प्रसिध्द होणा-या कोल्हापूर उद्यमवार्ता या पाक्षिकाच्या मुख्यसंपादकपदी श्री.नितीन वाडीकर यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.  वरील सर्व पदाधिका-यांची निवड ही सन 2022-23 या सालाकरिता आहे.  ही सभा संचालक श्री.संजय अंगडी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.      मावळते अध्यक्ष श्री.सचिन मेनन यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा घेतला व सर्व सहकारी संचालकांचे आभार मानले.   यावेळी श्री.सचिन मेनन यांचे नूतन अध्यक्ष श्री.हर्षद दलाल यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून अभिनंदन व आभार व्यक्त केले.  नुतन अध्यक्ष श्री.हर्षद दलाल यांनी यापुढेही अमृत महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम सर्व संचालक,सर्व सभासदांच्या सहकार्याने घेण्यात येतील तसेच या वर्षात अनेक विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशिल राहू असे मत व्यक्त केले.  यावेळी सचिव श्री.कमलाकांत कुलकर्णी, सह सचिव श्री.प्रसन्न तेरदाळकर यांनी या निवडीबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी सर्व नूतन पदाधिका-यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व  पुढील कार्यास सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सर्व श्री. हर्षद दलाल,

दिनेश बुधले, कमलाकांत कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळकर, सचिन मेनन, श्रीकांत दुधाणे, रणजीत शाह, संजय अंगडी, बाबासो कोंडेकर, नितीन वाडीकर, अतुल आरवाडे, अमर करांडे, अभिषेक सावेकर   प्रदीप व्हरांबळे इ. उपस्थित होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur