Shivaji Udyam Nagar,
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूरात तीव्र आंदोलन
रद्द करा.. रद्द करा,, वीज दरवाढ रद्द करा
वीजदरवाढ रद्द झालीच पाहिजे अश्या घोषणा देवून महावितरण कार्यालयाचा परिसर दणाणून सोडण्यात आला.
महावितरण कंपनीने विज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीज दरवाढ प्रस्तावास कडाडून विरोध करण्यासाठी तसेच हा प्रस्ताव रद्द करावा यासाठी सर्व औद्योगिक संघटनांच्यावतीने महावितरण कार्यालय ताराबाई पार्क,कोल्हापूर येथे आंदोनल करण्यात आले तसेच वीजदरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात आली. त्याचबरोबर मुख्य अभियंता श्री.भागवन यांना निवेदन देवून वीजदरवाढ रद्द करण्याची मागणी सर्व असोसिएशनच्यावतीने करण्यात आली.
त्यानंतर मा.मुख्यमंत्री यांना येथील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत वीजदरवाढीचा प्रस्ताव रद्द करणेसाठी निवेदन देण्यात आले, हे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी श्री.संजय शिंदे यांनी स्विकारले. यावेळी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे श्री अध्यक्ष हर्षद दलाल, प्रसन्न तेरदाळकर, श्रीकांत दुधाणे, संजय अंगडी, विश्वजीत सावंत तसेच कोल्हापूर चेंबर आॅफ काॅमर्सचे संजय शेटे, संजय पाटील, आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, संपत पाटील, राहूल नष्टे, प्रशांत शिंदे, अनिल धडाम, संभाजीराव पोवार,धर्मपाल जिरगे, आयआयएफचे विनय खोबरे, गोशिमाचे अध्यक्ष श्री.दिपक चोरगे, सीआयआय श्री.रवि डोली, महाराष्ट् चेंबर आॅफ काॅमर्सचे अध्यक्ष श्री.ललीत गांधी, स्मॅकचे अध्यक्ष श्री.दिपक पाटील व उपाध्यक्ष एम.वाय.पाटील
1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur