Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u914847794/domains/keaindia.org/public_html/include_db.php on line 46
Events - Kolhapur Engineering Association - Promoting Healthy Growth & Development of Industries

कोल्हापूर दि.29ः येथील कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या विश्वस्त मंडळाची सभा संपन्न झाली. या सभेत सन 2023-24 करिता पुढील प्रमाणे पदाधिका-यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री.दिनेश बुधले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी श्री.बाबासाहेब कोंडेकर , सचिवपदी श्री.प्रसन्न तेरदाळकर यांची निवड करण्यात आली तर खजिनदारपदी श्री.कमलाकांत कुलकर्णी यांची सर्वानुमते सलग 24 व्या वर्षी फेरनिवड करण्यात आली. स्विकृत संचालकपदी सर्व श्री.जयदिप मांगोरे आणि श्री.सोहन शिरगावकर यांचीही सर्वानुमते फेर निवड करण्यात आली. कोल्हापूर उद्यमवार्ताच्या मुख्य संपादकपदी विश्वस्त श्री.नितीन वाडीकर यांची फेरनिवड करण्यात आली. विश्वस्त श्री.सचिन मेनन यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. निवडीनंतर सर्व नविन पदाधिका-यांचे उपस्थितांनी पुष्पगुच्छ देवून हार्दीक अभिनंदन केले. माजी अध्यक्ष श्री.हर्षद दलाल यांनी त्यांच्या कारकिर्दीतील कामकाजाचा आढावा घेतला, अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध समारंभ, सभा, सभासदांसाठीचे उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संचालकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. नुतन अध्यक्ष श्री.दिनेश बुधले यांनी भविष्यातील असोसिएशनच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. सभासद उद्योजकांचे प्रलंबीत विषय आणि प्रश्न विविध शासकीय विभागाकडे सोडविण्यासाठी कार्य सुरू आहे तो पाठपुरावा सुरू राहील तसेच सर्व राजकिय पक्षांच्या सहकार्याने हे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य घेतले जाईल असे सांगितले. सर्व सभासदांच्या सहकार्याने व सहभागाने विविध कार्यक्रम आयोजित करू असे मनोगत खजिनदार श्री.कमलाकांत कुलकर्णीसोा यांनी केले. माजी अध्यक्ष श्री.हर्षद दलाल यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा उल्लेख श्री.दिनेश बुधले यांनी केला. या सभेचे अध्यक्ष श्री.सचिन मेननसोा यांच्याहस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. यावेळी सर्व सचिन मेनन , दिनेश बुधले, बाबासोा कोंडेकर, प्रसन्न तेरदाळकर,कमलाकांत कुलकर्णी, हर्षद दलाल, नितीन वाडीकर, संजय अंगडी, अतुल आरवाडे,अमर करांडे, अभिषेक सावेकर, प्रदीप व्हरांबळे, इ. उपस्थित होते


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur