आपल्याकडे ज्ञान आहे त्याचे प्राॅडक्ट करा-दिपक धडोती
आपल्या भारतात तसेच कोल्हापूरमध्येही भरपूर टॅलेंट व ज्ञान आहे परंतु त्याचे प्राॅडक्टमध्ये रूपांतर होत नाही, त्यामुळे आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचे प्राॅडक्ट करा असे प्रतिपादन दिपक धडोती यांनी केले. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अमृत महोत्सवा निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ‘‘ 75 नॅशनल क्रिटीकल प्रोजेक्टस् आॅन अमृत काल आॅफ इंडिया ‘‘ या विषयावर ते बोलत होते.
मी अमेरिकेत काम करत होतो त्यानंतर 2002 साली भारतात परत आलो. भारताचा अमृत महोत्सव सुरू आहे या निमित्त आयोजित सभेस दिल्लीला गेलो होतो त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री मा.ना.श्री.राजनाथ सिंह यांनी सुचविले की 75 विषयावर विविध प्रोजेक्ट तयारकरा आणि त्याचे प्रझेनटेशन द्या. मी इंजिनिअर आहे आमच्याकडे तंत्रज्ञान आहे त्यामुळे प्रझेनटेशनही तयार होते लगेचच सादर केले आणि काम करू लागलो.
आपल्या प्रत्येकाकडे टॅलेंट आहे त्याचा आनंद आपण घेतो. परंतु प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे आहेत. विकसित देशात मोठयाप्रमाणावर टेक्नाॅलाॅजिचा वापर करून अनेक प्रयोग केले जातात व त्याआधारे त्या देशाची प्रगती करतात. भारतातही असे तंत्रज्ञान वापरून भारताला प्रगत देश बनविण्याच्या हेतून काम करू लागलो. अनेक नामवंत सायंटीस्ट लोकांच्या संपर्क येवू लागला, यामध्ये डाॅ.अब्दुल कलाम यांचा सहभाग आहे.
बेळगावमध्ये छोटेशे शेड घेवून काम सुरू केले आणि नफा मिळू लागला. नविन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पैशाची गरज भासू लागली. बॅंकेकडे कर्ज मागितले तारण देण्यासाठी कांही नव्हते नफा मोठा होता मग बॅंकच म्हणाली कि तुमचा ब्रेनचं तारण ठेवा, सीसी लिमिट 5 कोटी होती नंतर ती 50 कोटी झाली.
कांही उद्योगामध्ये चांगले काम सुरू आहे परंतु योग्य सर्वे होत नसल्याने त्यांची प्रगती होत नाही, कुशल मनुष्यबळ पाहिजे. कुशल मनुष्यबळ घेवून काम सुरू केले. ड्रोन,सॅटेलाईट, पाणबुडी, रणगाडे, सर्व सर्वो ऍक्टिट्युटेर्स करू लागलो. आम्ही सर्वो कंट्रोलर्समध्ये बांधकाम साहित्य निर्मितीसाठी लागणारे सॉफ्टवेअर तयार करू लागलो , ट्रक , डोझर आणि उपकरणे हायड्रोलिक व्हाँल्व व कंट्रोलर्स करू लागलो.
अमेरिकेत गेलो तेथे 1615 साली युस चेंबर आॅफ काॅमर्सची स्थापना झाली होती यावरूनच तेथील लोक आपल्या पेक्षा 400 वर्षानी पुढे आहेत याची जाणीव झाली, आणि आज आपण अमृत महोत्सव साजरा करित आहोत. आपण नक्कीच त्यांच्या बरोबरीने काम करू, परंतु त्यासाठी इनोव्हेशन आणि टेक्नाॅलाॅजी पाहिजे. तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, कोरोना विषाणूपेक्षाही 200 नाॅनोमिटर पेक्षा कमी पार्ट तयार होवू लागले आहेत. परंतु आपल्याकडे टेक्नाॅलाॅजी नसल्याने आपण मोबाईलही बनवू शकत नाही. भारतामध्ये उत्पादने तयार करण्यासाठी आम्ही आजही भारतात इनव्हर कास्टिंग आयात करतो . आम्ही केलेली उत्पादने तपासण्यासाठी परदेशी लोक बेळगावला येतात ही आहे आपली टेक्नाॅलाॅजी. भारत एक महान देश आहे, भारतात सन 1989 साली सेमी कण्डक्टर चिप बनविण्याचा लॅब होती परंतु ती उध्वस्त झाली, आपणास कोणी पुढे जावू देत नाही, सुपर काॅम्प्युटर बनविण्याचा प्रयत्न करित आहोत परंतु त्यासाठीही पुढे जावू दिले जात नाही पाय खेचण्याचे काम मात्र केले जाते. देशातील अनेक संस्था ज्यामध्ये एरोस्पेस, संरक्षण उपकरणे तयार होता त्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. ताजवर हल्ला झाला त्यावेळी टाटा साहेबानी आंम्हास बोलावून घेतले आणि सुरक्षेच्या दृष्टीने सव्र्होकंट्रोल्सला भागीदार बनविले. पार्ट बनविण्यासाठी टॅलेंट लागते पैशाने मोबाईल बनत नसतो ही आजची टेक्नाॅलाॅजी व इंजिनिअरिंग. आज इस्त्राईल सारख्या देशालाई आपण तंत्रज्ञानात मदत करत आहोत आणि तेथील लोक भारतात तयार होणारे पार्ट त्यांच्या देशात बसूनच तपासतात , त्यांना भारतात येण्याची गरज नाही ही आजची टेक्नाॅलाॅजी. 207 इस्त्राईल लोकांना नोबेल पारितोषके मिळाली आहेत ते उगाच मिळालेली नाही. एक मायक्राॅन आपण कसे तपासणार ? नॅनो कसे मोजणार? यासाठी लॅब पाहिजे, या ठिकाणी पैसा लागतो. विचार झपाटयाने बदलत आहे त्यामुळे कोल्हापूर हे उद्योगांचे हब व्हावे अशी टेक्नाॅलाॅजी या ठिकाणी विकसीत होवू दे असे प्रतिपादन त्यांनी केले. आज युवा पिढी तंत्रज्ञान वापराच्या बाबतीत चुकीच्या मार्गाने जात आहे. देवाची लाकडी मुर्ती ठेवली आणि रावणाची सोन्याची मुर्ती ठेवली तर लोक रावणाचीच मुर्ती घेवू जातात असे ध्यान्यात येईल. ज्ञान मिळविण्यासाठी शिकलेले असणे गरजेचे नाही कमी शिकलेली मंडळीही मोठी उद्योजक झाली आहेत, बापूसाहेब जाधव हे त्यापैकीच एक व्यक्तीमत्व होते हे लक्षात घ्या. भरपूर पैसे, मोठी इमारत, कोटयावधींची यंत्रसामग्री असून उद्योजक होता येत नाही. यषस्वी उद्योजक होण्यासाठी कौशल्य, ज्ञान, जिद्द, इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. देशात प्रचंड गुणवत्ता आहे, कौशल्याचा वापर करून मागणी असलेले उत्पादने तयार केले पाहिजेत. आपल्या देशात अजूनही चांगला पगार देण्याची ऐपत असणारे उद्योजक मोइया संख्येने तयार झालेले नाहीत. यामुळे चांगल्या पगाराचे पॅकेज देउन देशातून टॅलेंट अमेरिका व इतर देश पळवत आहेत. म्हणून बाहेरून येथे मोठे उद्योग यावेत अशी अपेक्षा करण्यापेक्षा येथील उद्योजकच मोठे होवून देशातील टॅलेंट देशासाठीच वापरणे काळाची गरज आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डाॅ. डी टी शिर्के म्हणाले की , आत्मनिरर्भर भारतात अनेक मोठया लोकांनी उद्योजकांनी योगदान दिले आहे, अजूनही देत आहेत. आज फौंड्री सारखा उद्योगाला मोठी जागा लागते परंतु नविन टेक्नाॅलाॅजीने कमी जागेतही मोठी उत्पादने घेता आली पाहिजेत असे तंत्रज्ञान विकसित होणे गरजेचे आहे. कोल्हापूरात मोठे उद्योग येणे गरजेचे आहे. आज विद्यापीठाकडे क्लिष्ट विषय अभ्यासाठी आले पाहिजेत, आमचे डोकं खाल्ले पाहिजे असे प्रश्न आमच्याकडे येणे आवश्यक आहे तरच विकास होईल यात शंका नाही. कोल्हापूरचे उदाहरण घेतल्यास न शिकताही ज्ञानी होता येतं हे कोल्हापूरने सिध्द केले आहे. त्यामध्ये आता व्हॅल्यु अॅडीशन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दीपक धडोतीसाहेबांनी आज 21 व्या शतकाला पुरेल इतके उतुंग आणि मोठे संदेश दिले आहेत याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल परंतु यांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. धडोतीसाहेबांसारखी लोक आपल्या कल्पनेपलीकडे विचार करून उत्पादने तयारकरित आहे हे विशेष आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री.दिनेश बुधलेसो यांनी केले, असोसिएशनच्या कार्याची, इतिहासाची आणि अमृत महोत्सवी उपक्रांची माहिती दिली. दीपक धडोती यांची ओळख उपाध्यक्ष श्री.बाबासोा कोंडेकर यांनी केली तर डाॅ.डी.टी.शिर्के यांची ओळख टेªझरर श्री.कमलाकांत कुलकर्णी यांनी करून दिली. दीपक धडोती आणि डाॅ.डी.टि. शिर्के याचा शाल,श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून अध्यक्ष श्री.दिनेश बुधले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. असोसिएशनचे आजीव सभासद झालेबद्दल सभासदांचा सत्कार करण्यात आला तसेच युवा उद्योजक श्री.समिर यांदव यांना युवा उद्योजक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.दीपक धडोती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन सेक्रेटरी श्री.प्रसन्न तेरदाळकर यांनी केले तर सूत्रसंचालन कार्यालयीन सचिव प्रदीप व्हरांबळे यांनी केले.
यावेळी सर्व श्री.दिनेश बुधले, बाबासो कोंडेकर, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, हर्षद दलाल, रणजित शाह, संजय अंगडी, नितीन वाडीकर, अतुल आरवाडे, अमर करांडे, जयदीप मांगोरे, दीपक पाटील, एम.वाय.पाटील, ललीत गांधी, जयराजभाई वसा, डाॅ.विलास कार्जिनी, पुराणीक, ए टी कुडचे, डाॅ.सुभाष माने, चंद्रकांत चोरगे, किरण चरणे, प्रदीपभाई कापडिया, विज्ञान मंुडे, संजय पेंडसे, मोहन कुशिरे, राजेंद्र डुणंूग, मुबारक शेख, दिलावर शेख, संगीता नलवडे, शांताराम सुर्वे, सुरेंद्र जैन, नलीनी नेने, सुशिल हंजे, प्रशांत मोरे व मोठया संख्येने सभासद उपस्थित होते.