जगामध्ये 90 च्या दशकात अर्थव्यवस्था खुली झाली त्यानंतर झपाटयाने जगाबरोबर भारतातही बदल झाले. औद्योगिक उत्पादनांची गरज आणि संख्या कित्येक पटीने वाढली. त्यामुळे हया गरजा पुर्ण करणे, त्यातील त्रुटी शोधून दुरूस्त करणे आवश्यक झाले. त्यामुळे आपल्या गरजा ओळखा आणि इंडस्ट्ी 4.0 या तंत्रज्ञानाचा पुर्ण वापर करा असे प्रतिपादन श्री.दत्तात्रय नवलगुंदकर यांनी केले, ते कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अमृत महोत्सवा निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होते. आज पुण्या सारख्या शहरात सर्वात जास्त वाहनांची नोंद होत आहे, अश्यावेळी रोड ट्ॅफिक कसे कंट्ोल करणार याचे तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे आहे. अशी विविध तंत्रज्ञान विकसित करण्यात गंुतवणूक केल्यास याचा परतावा नक्कीच मिळेल यात शंका नाही. आपला शेजारी करतो म्हणून किंवा पुरवठादार करतो म्हणून उत्पादन करू नका. इंडस्ट्ी 4.0 यामधील सर्व गोष्टींचा वापर करणार नसाल तर उपयोग होणार नाही. तसेच नविन तंत्रज्ञान घेण्यापुर्वी त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ नक्की पाहिजे अन्यथा फारच अडथळे निर्माण होतील. इंडस्ट्ी 4.0 चा फारसा प्रसार झाला नाही त्यामुळे त्याची नक्की व्याख्या करता आली नाही. आमच्या कंपनीतर्फे कारखान्यात तीन शिप्टमध्ये जावून नक्की काय,काय होते असे आंम्ही सव्वा वर्षे पाहिले, अनेक शाखांमध्ये फिरलो त्यानंतर आंम्ही रोजच्या कामात मदत होईल यासाठी 52 साफ्टवेअर तयार केली. परंतु यासाठी सुध्दा डेटा म्हणजेच माहितीची गरज आहे. त्यामुळे हा डाटा तयार करण्यासाठी कुशल मनुष्य बळाचा मोठा वाटा आहे. ऑटोमेशन झाले तरी ते कसे वापरावयाचे हे माहिती पाहिजे हे महत्वाचे आहे. उद्योगामध्ये उत्पादनाचे ड्ाईंग खराब होतात त्यामुळे ते स्क्रीनवर पाहता येईल का ? नंतर त्यामध्ये कामाचा सुचना दिसतील का ? त्यानंतर त्यांचा व्हीडीओ करता येईल का ? त्यानंतर त्याचे डिजीटलमध्ये रूपांतर करता येईल का ? अश्या प्रकारचे संशोधन आता आले आहे. परंतु सध्या अनेक उद्योगामध्ये अजूनही 50 वर्षे वयाचे लोक काम करित आहे त्यामानाने नवीन तरूण असे तंत्रज्ञान समजून घेण्यात आणि वापरण्यात पुढे आहेत आणि एखादी जादू केल्यासारखे ते या तंत्रज्ञानाचा वापर करित आहेत. उत्तम अॅप बनविणे, टॅ्फीक कंट्ोलसाठी कॅमे-याच्या मदतीने संबंधीतांना स्पीड वाढले की मोबाईलवर सूचना जाते, रोबोटीक तंत्रज्ञानाचा प्रोग्रॅम तयार केले जात आहेत. भारतामध्ये अजून आपल्या उद्योगातील समस्या व प्रश्न हे मूलभूत स्वरूपाचे आहेत. आज गुगल पे सारखे तंत्रज्ञान विकसित झाले आहे त्यामुळे लोकांच्या खिशात सुट्टी नाणी खुप कमी झाली आहेत. आपली गरज ओळखून त्यावरती काम करा त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजे स्वतःचा इन्शुरन्स काढल्या सारखे आहे आणि यासाठी खर्च फारसा नाही परंतु उद्योगाचा नफा वाढेल हे नक्की असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पाटील म्हणाले विद्यापीठाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकविले. संशोधनासाठी प्रयोगशाळा लागते त्यासाठी निधी लागतो तो दिल्लीमध्ये असलेल्या संस्थाकडे पाठपुरावा करून घ्यावा लागतो. जागतीक दर्जाच्या संशोधनासाठी चांगल्या दर्जाची गरज आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्था आणि उद्योगांनी एकत्रित येवून काम केले पाहिजे. विद्यापिठात अशी सेंटर कार्यरत आहेत. संशोधन आणि उद्योगांची सांगड घातली तर विकास नक्कीच होतो. त्यामुळे ज्यांनी कालसुसंगत बदल केले ते सुपरपॉवर झाले असे विकसित देशांकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. संशोधन उद्योग क्षेत्राशी निगडित असावे त्यामुळे अनेक प्रगत देश दिसत आहेत. यातून अनेक युनिक प्रॉडक्ट तयार करता येतील. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीव्दारे विद्यार्थी केंद्र बिंदू मानून काम करू, नवनविन उत्पादने तयार करता आली पाहिजे व अशी उत्पादने तयार झाल्यास तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही असे डॉ.प्रमोद पाटील म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्ष श्री.दिनेश बुधले यांनी प्रास्ताविक केले, श्री.नवलगंुदकर यांची ओळख उपाध्यक्ष श्री.बाबासो कोंडेकर यांनी तर डॉ.प्रमोद पाटील यांची ओळख खजिनदार श्री.कमलाकांत कुलकर्णी यांनी करून दिली. श्री.दत्तात्रय नवलगुंदकर आणि डॉ.प्रमोद पाटील यांचा शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून अध्यक्ष श्री.दिनेश बुधले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशन सल्लागार निमंत्रित सदस्य अॅडव्होकेट श्री.अशोक उपाध्ये यांचा महाराष्ट् आणि गोवा बार कौन्सीलच्या वतीने अखंडित 47 वर्षे कायदेविषयक सेवा केल्याबद्दल सत्कार करण्यात आला होता त्याबद्दल सर्व उपस्थितांनी त्यांचे टाळा वाजवून अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन सेक्रेटरी श्री.प्रसन्न तेरदाळकर यांनी मांडले. सूत्रसंचालक सचिव श्री.प्रदीप व्हरांबळे यांनी केले. यावेळी सर्व श्री.दिनेश बुधले, बाबासो कोंडेकर, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी,रणजीत शाह, जयदिप मांगोरे, संजय अंगडी, संजय शेटे,सचिन शिरगावकर, हिंदूराव कामते, अशोकराव जाधव, अरविंद शिंदे, कुशल सामाणी, सुरेश मंडलीक,डॉ.सुभाष माने, विश्वजीत सावंत, अॅड.अशोक उपाध्ये, डॉ.ए.एम.गुरव,दिलावर शेख,प्रदीपभाई कापडिया,प्रशांत मोरे आणि मोठया संख्येेने उद्योजक उपस्थित होते.

Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur