Shivaji Udyam Nagar,
Kolhapur, Maharashtra
सन 2020 हे वर्ष उद्योगांसाठी चांगले-श्री.वसंत पाटील
अध्यक्ष व प्रमुख-पाॅलिस्टर मॅन्यूफॅक्चरिंग मे.रिलायन्स इंड.
यांचे प्रतिपादन.
‘‘भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ कमी झाली आहे. विकासाचा वेग 9.4 वरून 5.5 वर आला आहे, बॅंकाचे एनपीए मध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे 5 ट्लिीयनला अर्थव्यवस्था जाणे तेवढे सोप नाही असा रिपोर्ट आहे. असे असलेतरी सर्वच परिस्थिती खराब आहे असे नाही असे श्री.पाटील यांनी प्रतिपादन केले. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशने ‘‘सध्याची भारतीय अर्थव्यवस्था आणि उद्योगांपुढील आव्हाने’’ याविषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले.सन 2020 हया वर्षात नक्कीच परिस्थती सुधारेल व उद्योगांना उभारि मिळले. सरकारी धोरणे व योजना तसेच गेल्या आठ महिन्यात भारतात 64 बिलीयन डाॅलरची झालेली गंुतवणूक यामुळे हळुहळु पैसा येत आहे त्यामुळे आशा वाढल्या आहेत. यामुळे सरकारी तुट कमी होवून जीडीपी 3.2 पेक्षा जास्तच राहील. सरकारी खर्चामध्ये कपात होईल व रिझव्र्ह बॅंक रेट कमी करेल अशी आपेक्षा आहे.
पर्सनल टॅक्स, कार्पोरेट टॅक्स व डिव्हीडंडवरील टॅक्स दर कमी व्हावा, मॅटकर 15 टक्क्यापेक्षा कमी झाल्यास मदत होईल. मंदीच्याकाळात कांही उद्योग/कंपन्या बंद पडतात त्यांचे टॅक्सचे बंधन कमी होईल. एकूण 16 टक्के कर हा या इंजिनिअरिंग इंडस्ट्किडून भारताला मिळतो. 41 टक्के उद्योग हे इंजिनिअरिंग इंडस्ट्जि आहेत त्यांच्याकडून 92 लाख कोटी रूपये कर जमा होतो. त्यानंतर 56 लाख कोटी रू. हे केमिकल व टेक्स्टाईल या उद्योगातून मिळतो. निर्यातीत वाढ होत असून एसईझेड मुळे यास मदत होत आहे. सध्या बीओटी तत्वावर विमानतळे सुध्दा बांधण्याचे कामे होत असून इन्फ्रास्ट्क्चरची कामे होत आहेत.
उद्योगांना सध्या कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असून उद्योगांनी अकुशल लोकांना कुशल करून त्याचा उपयोग उद्योगांना होईल. नियोजनपुर्वक गंुतवणूक करून उद्योगांनी सुरक्षा पहाणे गरजेचे आहे. रोबोटीक व आॅटोमाजेशन यातत्रज्ञानमुळे उद्योगांस गती प्राप्त होत असून मोठे बदल होत आहेत याबाबत जागरूक रहा. आर अॅण्ड डी वरती खर्च करून परदेशी बाजारपेठ काबीज करा व उद्योगांचा विस्तार करा. स्टाॅकमध्ये जास्त भांडवल अडकून रहाणार नाही याची काळजी घ्या, उद्योगात ठरलेले खर्च करण्याचे प्लॅनिंग करा व तेही वेळेत करा अन्यथा तुमचे नियोजन चुकत आहे हे नक्की याबाबत दक्ष रहा असा, एकाच उद्योगात उडकून राहू नका, बाहेर पडा, नेहमी मोठे ध्येय आणि मोठाच विचार करून कामाला लागा सल्लाही श्री.पाटील यांनी उद्योजकांना दिला.
या व्याख्यानात त्यांनी उद्योगपती स्व.श्री.धिरूभाई अंबानी व रिलायन्स उद्योगाची यशोगाथा सांगून अवाढव्य कार्याची माहीती दिली.
श्री.पाटील हे मुळचे कोल्हापूरातील असल्याने कोल्हापूरच्या आठवणी,शाळेतील कांही क्षण उपस्थितांना सांगितल्या. सुरवातीस अध्यक्ष श्री.अतुल आरवाडे यांनी प्रास्ताविक करून असोसिएशनच्या विविध कार्याची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांची ओळख श्री.नितीन वाडीकर यांनी करून दिली, असोसिएशनच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा शाल,श्रीफळ,स्मृतीचिन्ह,पुष्पगुच्छ देवून सत्कार अध्यक्ष श्री.अतुल आरवाडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सर्व औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी यांच्या तर्फे पुष्पगुच्छ देवून प्रमुख पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. संचालक श्री.नितीन वाडीकरसो यांच्या महाराष्ट् मशिन ग्रुपला आयपीएफ इंडस्ट्यिल एक्सलन्स पुरस्कार मिळालेबद्दल त्यांच्या पुष्पगुच्छ देवून प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष श्री.रणजीत शाह यांनी केले, सूत्र संचालन सचिव श्री.प्रदीप व्हरांबळे यांनी केले. यावेळी श्री.पाटीलयांच्या बालपणीच्या व वर्गमित्रानी त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
यावेळी सर्व श्री.अतुल आरवाडे,रणजीत शाह,कमलाकांत कुलकर्णी,दिनेश बुधले,सचिन मेनन,नितीन वाडीकर,रामप्रताप झंवर,बाबाभाई वसा,अतुल पाटील,प्रसन्न तेरदाळकर,जयदिप मांगोरे,संजय पेंडसे,मोहन पंडितराव,शिवाजीराव पोवार,व्ही.एन.देशपांडे, जयराज भाई वसा,श्यामसुंदर देशिंगकर,प्रदीपभाई कापडिया,कुशल सामाणी,गिरिष कुलकर्णी, अभय पंडितराव,प्रसाद बांदेकर,सुशिल हंजे,मोहन कुशिरे,बाळासाहेब सोळोखे, नरेंद्र माटे,दिलावर शेख,संगिता नलवडे,पृथ्वीराज कटके,रामराजे बदाले,डाॅ.ए.एम.गुरव इ. मान्यवर उपस्थित होते...
1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur