ईलेक्ट्रीक वाहनांबरोबरच आयसी इंजिनला सुध्दा पुढील पंधरा वर्षे मागणी कायम राहील- कमलकिशोर वोरा.

कोल्हापूर दि.22 जुलै:- ईलेक्ट्रीक वाहने ही कांही नविन संकल्पना नाही 1832 पासून यावर संशोधन आणि निर्मिती झाली आहे.  सध्या ईव्ही वाहनांना चांगली मागणी असली तरी सध्याच्या आयसी इंजिन असलेल्या वाहनांनासुध्दा पुढील पंधरा वर्षे मागणी असले त्यामुळे यावर आधारित उद्योगांनी काळजी करण्याचे कारण नाही असे प्रतिपादन माजी वरिष्ठ सह संचालक व प्रमुख ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अकॅडमी अॅण्ड नॉलेज सेंटर एआएआय, पुणे यांनी केले, ते कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ‘‘फ्युचर ऑफ ईलेक्ट्रीक अॅण्ड आयसी इंजिन व्हेईकल इन इंडिया’’ या विषयावर बोलत होते.
पुर्वी वाहने निर्मिती करण्यासाठी सुध्दा लायसन लागायचे कारण लायसन राज होते, जागतीकीकरणामुळे यामध्ये बरेच बदल झाले.  वाहन निर्मितीमध्ये अमेरिका, चीन नंतर भारताचा क्रमांक येतो.  सध्या खुप मोठया प्रमाणात स्टार्टअप सुरू झाले असून अजूनही होत आहेत.  आपल्याकडे वाहन असणे हे पुर्वी ऐषोआराम मानले जायचे परंतु त्याचे आता गरजेत रूपांतर झाले आहे.

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदुषण, पार्किंग सारखे मोठे प्रश्नही आहेत.  पुण्यामध्ये लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या जास्त आहे.  शहरीभागात वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे हा चिंतेचा विषय आहे.  ईलेक्ट्रीक वाहनांमुळे पेट्रोल,डिझेल्सची बचत होते, प्रदुषण होत नाही.   परंतु ज्या ठिकाणी ईलेक्ट्रीक वाहनांची निर्मिती होते त्या ठिकाणी प्रदुषण होते त्याचे काय असे अनेक प्रश्न आहेत.    त्यासाठी जास्तीत जास्त सौरउर्जेव्दारे वीज निर्मितीवर भर दिला जात आहे.  शासनही त्यासाठी मोठया प्रमाणावर सबसिडी देवून उद्योग आणि अर्थकारणाला प्रोत्साहीत करत आहे.

सन 1832 ते 1880 या कालावधीत ईलेक्ट्रीक वाहनांबाबत संशोधन होवून वाहन निर्मिती झाली परंतु यातील दोषही लक्षात आले.   1970 मध्ये कॅलीफोर्नियामध्ये याबाबत प्रथमतः कांही नियम करण्यात आले व संशोधन होवू लागले.  रेवा कंपनीने सर्व प्रथम ईलेक्ट्रीक वाहनांची निर्मिती केली.  यामध्येही प्रकार असून प्युअर ईलेक्ट्रीक, हौड्रो, मोटर व बॅटरी असे भाग आहेत.  परंतु त्यावेळ ही वाहने महाग होती.  सध्या असलेली ईलेक्ट्रीक वाहने मीही गेल्या दीड वर्षापासून वापरत आहे, प्रदुषण होत नाही, पेट्रोल व पैशाचीही बचत होते.  आपणाकडे अजूनही कांही ठिकाणी आजोबांनी वापरलेली स्कुटर, त्यानंतर मुलाने त्यानंतर नातवाने वापरलेली स्कुटर अजून आपल्या घरात ठेवतो, परंतु नवीन पिढी हया गोष्ठी विकत नकोततर भाडयाने घेण्याचे पर्याय निवडत आहेत.  ईलेक्ट्रीक वाहनांमध्ये मोटर, बॅटरी, साठवणूक, बॅटरी व्यवस्थापन प्रणाली असे महत्वाच्या गोष्टी आहेत.  सन 2023 मध्ये आपल्याकडे असलेले ज्ञानपैकी 85 टक्के ज्ञान भविष्यात कांही कामाचे असणार नाही.  मुंबई सारख्या शहरात कांही सोसायटीच्या ठिकाणी ईलेक्ट्रीक वाहने पार्किंगमध्ये लावू दिली जात नाहीत.  यातील बॅटरी आपण भाडेतत्वावर सुध्दा घेवू शकू.  कमी क्षमतेच्या ईलेक्ट्रीक वाहनांना सर्टीफिकेटची गरज नाही.  भारतात सध्या 300 मिलीयन वाहने आहेत ही वाहने आपण ईलेक्ट्रीकमध्ये बदलू शकतो त्यामुळे सुध्दा ऑटोमोबाईल क्षेत्रात कामे वाढतील.  ईलेक्ट्रीक वाहनांमध्ये बॅटरी स्टॅण्डर्ड महत्वाचे आहे, ईलेक्ट्रीक बॅटरी,हौड्रो ईलेक्ट्रीक, प्लगइन हौड्रो ईलेक्ट्रीक, फ्युएलसेल ईलेक्ट्रीक अश्या  प्रकारची वाहने आहेत.   पेट्रोल डिझेलपेक्षा ही वाहने फायदेशिर आहेत.  परंतु दुचाकी पेक्षा चारचाकी वाहनांमध्ये अजूनही वाढ झालेली नाही.  ईलेक्ट्रीक वाहन उद्योगांबाबत सध्याची आव्हाने म्हणजे किंमत जास्त, साठवणूक कार्यक्षमता, चार्जिंग स्टेशनची कमतरता, चार्जिंगला वेळ लागणे, सप्लाय चेन मॅनेजमेंट, वातावरणातील बदल, सुरक्षेचे मुद्दे, थर्मल मॅनेजमेंटची आव्हाने,  बॅटरी रिसायकलींग आणि महत्वाचे म्हणजे याबाबत जागृकता कमी असणे ही आहेत.  निती आयोगसुध्दा यावर चांगले काम करित आहे.  आत्मनिर्भर भारत अंतर्गत टेस्लाची वाहन निर्मितीही भारत होणार आहे.यासाठी सबसिडी दिली जात आहे.  देशांत ईलेक्ट्रीक बाबतची धोरणे तयार केली असून महाराष्ट्राचे धोरण सर्वात चांगले आहे.  टाटा उद्योगांतर्फे बॅटरी तयार करण्याचा कारखाना सुरू होणार आहे.  सध्या बाजारातील मागणी ही आयसी इंजिन टू ईव्ही इंजिन आहे.  परदेशात अनेक ठिकाणी आपल्या जुन्या गाडयाचे इंजिन घेवून पुर्ववत नविन करून देतात ही सुविधाही उपलब्ध आहे.  सध्या अनेक तंत्रज्ञान मुक्तपणे मिळत असून इस्त्रोनही आपले तंत्रज्ञान ब-यापैकी खासगी उद्योजकांकडून घेण्यास सुरवात केली आहे.  झिरो इमिशनवर चालणारी वाहने निर्मितीहोत आहेत.  

कोवीड नंतर अनेक उत्पादने चीनकडून घेणे बंद झाले असून भारतीय उद्योगांना याचा चांगला फायदा झाला आहे.  यापुढील काळात उद्योजकांना नविन तंत्रज्ञानाचे भागीदार घेवून काम करावे लागतील.  सध्याचे आयसी इंजिन लगेचच बंद होणार नाही त्याला आणखिन किमान पंधरावर्षे तरी जावी लागतील त्यामुळे सध्यातरी फारशी काळजी करण्याचे कारण नाही.  भारत सरकार नॅशनल हौड्रोजन मिशनवरती काम करित आहे.  हौड्रोजन व्हेईकलवरील अजूनही संशोधन सुरू आहे.  रिलायन्स कंपनीचे पुढील दोन ते तीन वर्षात यावर आधारित वाहने येतील.  हौड्रोजनला वास नाही, हे दिसणारही नाही तसेच ते धोकादायक असून आग लागलेली सुध्दा दिसणार नाही त्यामुळे यावरती सखोल संशोधना अंती हे तंत्रज्ञान वापरावे लागेल.  स्वित्झरलॅण्ड सारख्या देशात अश्या वाहनांसाठी कडक निंर्बध आहेत.  या देशात उच्च गुणवत्ता आणि पर्यावरणास अनकुल असे मानांकने आहेत त्यामुळे या देशात आजही ईलेक्टीक वाहनांचे उत्पादन होत नाही.  सर्वात महत्वाची आपली सुरक्षा आहे.   सुरक्षेबाबत आपणास शालेय शिक्षणापासूनच ज्ञान दिले पाहिजे. आपण सर्व गिनीपीग आहोत.   श्री.वोरासाहेबांनी यावेळी सचित्र ईलेक्ट्रीक आणि पेट्रोल वाहनांची तुलनात्मक तांत्रिक माहिती दिली.  ईलेक्ट्रीक व्हेईकल सन 2030 पर्यंत यामध्ये 91 टक्यांची वाढ होईल असे निती आयोगाचे धोरण असून यासाठी शासन उद्योगांना प्रोत्साहीत करित आहे.  ईलेक्ट्रीक वाहनांची नविन श्रेणी काय असेल, त्याची व्हॅल्युचेन काय आहे, त्यासाठी लागणारा कच्चा माल कोणता आहे, बॅटरी उत्पादन, बाजारातील मागणीचा अभ्यास , ईलेक्ट्रीक वाहनांच्या सुटया भागाची मागणीत होणारी वाढ , आयसी इंजिन आणि ईलेक्ट्रीक वाहने यांची तुलनात्मक माहिती दिली.  टॅªक्टर, पोकलॅण्ड, अवजड माल वाहतूक करणारी वाहणे यांना सध्या आयसी इंजिनच महत्वाचे आहे.  सरकार नॅशनल ग्रीन हौड्रोमिशनवर काम करित आहे.  त्यामुळे भविष्यात हौड्रोजनवर आधारित वाहने येतील यात शंका नाही. परंतु यासाठीसुध्दा चांगले धोरण,     नविन तंत्रज्ञान आणि प्रक्षिणाची गरज आहे अशी माहिती श्री.कमलकिशोर वोरा यांनी यावेळी दिली.  

कार्यक्रमाच्या सुरवातीस मा.अध्यक्ष श्री.दिनेश बुधलेसोा यांनी प्रास्तावीक केले, यामध्ये त्यांनी ईलेक्ट्रीक व्हेईकलमुळे उद्योजकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम, याबाबतची तांत्रिक माहिती, ऑटोमोबाईल क्षेत्राची भविष्यातील वाटचाल कशी असावी यासाठी हा आजच्या विषयावर व्याख्यान आयोजित केले असल्याचे सांगितले.  त्यांच्या हस्ते श्री.कमलकिशोर वोरा यांचा शाल,श्रीफळ,स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.  पाहुण्याची ओळख उपाध्यक्ष श्री.बाबासो कोंडेकर यांनी करून दिली.  आभार प्रदर्शन सेक्रेटरी श्री.प्रसन्न तेरदाळकर यांनी केले तर सूत्रसंचालक श्री.प्रदीप व्हरांबळे यांनी केले.  यावेळी मोठया संख्येने उद्योजक उपस्थित होते.  सर्वश्री दिनेश बुधले, बाबासो कोंडेकर, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, श्रीकांत दुधाणे, सचिन मेनन,नितीन वाडीकर, अतुल आरवाडे, डॉ.सुभाष माने, एम.वाय.पाटील, हिंदूराव कामते, संजय पेंडसे, साजीद हुदली, जयकुमार पवार, उदय भोसले, निवास मिठारी, भालचंद्र कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, अविनाश देवमोरे, उदय दुधाणे, संजय तुंगतकर, दिपक मिरजे, दिलावर शेख, आदित्य पंडितराव, राजू पाटील, प्रदीपभाई कापडिया, सुरेश मंडलिक, अशोकराव जाधव, अविनाश शिरगावकर इ.मान्यवर उपस्थित होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur