कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात; डिजिटल डिरेक्टरीचे अनावरण

कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक जगतातील शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये 77 व्या स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग व्यवसायांचा एकप्रकारे 'विकीपीडिया' असणाऱ्या डिजिटल डिरेक्टरीचे अनावरण करण्यात आले. डिजिटल डिरेक्टरीमुळे व्यावसायिकांशी थेट संवाद साधून माहिती घेणार आहे. असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश बुधले यांच्या ध्वजारोहणचा सोहळा पार पडला. यावेळी कोल्हापूर उद्यम वार्ता अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना दिनेश बुधले यांनी स्वातंत्र्यांसाठी प्राणाची आहूती दिलेल्या वीरांचे स्मरण केले. तसेच जिल्ह्यातील उद्योग जगताचा तसेच असोसिएशनच्या आजवरच्या कामगिरीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती देत स्वातंत्र्य मिळवून दिले.  व्यापार करण्याच्या निमित्ताने आलेले दृष्ट आणि कपटी इंग्रजानी भारतावर केलेले दीडशे वर्षांचे राज्य, त्यांनी भारतीयांना दिलेले जुलमी वागणूक, केलेला छळ, स्वातंत्र्यांचा संघर्षाचा प्रेरणादायी काळ, स्वातंत्र मिळवायचे या इराद्याने पेठून उठलेला प्रत्येक भारतीय, त्यातून उभी राहिलेली चळवळ आणि मिळालेलं स्वातंत्र्य आपण सर्वांनी कदापीही विसरता कामा नये. नव्या पिढीने यापासून प्रेरणा घेवून आपले भविष्य साकारले पाहिजे.  

डिजिटल डिरेक्टरीचा शुभारंभ

दरम्यान,ध्वजारोहण पार पडल्यानंतर कोल्हापूर उद्यम वार्ताच्या स्वातंत्र्यदिन विशेषांकाचे प्रकाशन कारण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच मोबाईल अॅप आणि वेबसाईट स्वरूपात तयार करण्यात आलेल्या डिजिटल डिरेक्टरीचा शुभारंभ बुधले यांच्या हस्ते करण्यात आला. यामुळे 24x7 उद्योगांची माहिती अॅप आणि वेबसाईट स्वरूपात उपलब्ध होणार आहे. या डिरेक्टरीमध्ये शहरी भागातील, तसेच शिरोली, गोकुळ शिरगांव,कागल, इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, कुशिरे येथील उद्योगांचा समावेश आहे. कालांतराने आजरा,चंदगड येथील उद्योगांची माहिती यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.

या डिरेक्टरीमध्ये विविध प्रकारच्या सेवा मिळण्यासाठी माहिती आहे, त्याचप्रमाणे उद्योग विस्तार, नव उद्योजक निर्माण करण्यासाठी सरकारी योजनांची तसेच निर्यात विषयक माहिती उपलब्ध होणार आहे. सभासदांना ही डिरेक्टरी ऑनलाईन मोफत मिळणार असून इतरांसाठी नाममात्र किंमतीत ही डिरेक्टरी मिळणार आहे. कोल्हापुरात प्रथमच अशी डिजीटल डिरेक्टरी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे प्रकाशित करण्यात आली आहे.

प्रिटिंग स्वरूपात असलेली डिरेक्टरी अपटेड करता येत नाही, त्या शिवाय कागदाचा वापरही होतो जो पर्यावरणास धोकादायक आहे, तसेच माहिती दुरूस्ती आणि जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात ही डिरेक्टरी उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे डिरेक्टरी न छापता डिजीटल डिरेक्टरी प्रकाशित केल्याचे दिनेश बुधले यांनी सांगितले.  

कोल्हापूर उद्यमवार्ताचे मुख्य संपादक नितीन वाडीकर यांनी स्वातंत्र्यदिन विशेषांकाची वैशिष्ट्ये आणि वाचकांचा मिळत असलेला उत्तम प्रतिसाद याबद्दल माहिती दिली.

दरम्यान, 26 ऑगस्ट 2023 रोजी सक्सेस स्टोरी ऑफ मौर्या ग्रुप आणि फ्युचर चॅलेंजेस ऑफ इंडस्ट्रीज या विषय उद्योजक मंगेश पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले असून यावेळी सर्व उद्योजक सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपाध्यक्ष बाबासो कोंडेकर यांनी केले. उपस्थितांना जिलेबी आणि पेढे वाटून स्वातंत्रदिनाचा हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी सर्वश्री. दिनेश बुधले, बाबासो कोंडेकर, प्रसन्न तेरदाळर, कमलाकांत कुलकर्णी, श्रीकांत दुधाणे, संजय अंगडी, नितीन वाडीकर, सचिन मेनन, अमर करांडे, अभिषेक सावेकर, जयदिप मांगोरे, प्रभाकर कोंडूसकर, हिंदूराव कामते, चंद्रकांत चोरगे, संजय पाटील,विनय सांगले, सुनिल काळे, केदार तेंडुलकर, अनिल काळे, बंडोपत नवलडे, अशोकराव जाधव, किरण चरणे, अनिल देशपांडे, निवास मिठारी, वासुदेव घाडी, अनिल दुंडगे,शैलेश पुरोहीत, दिलावर शेख, आरिफ शेख,मुनिर महात, इकबाल गडवाले, सुशिल हंजे, पियुष दुधाणे,  पूजा वाडीकर, साक्षी कोंडेकर, विष्णु पंजवाणी, सुर्यकांत खोत. परशराम पाटील, ओकांर पोळ, शुभम जाधव, सोहम पोळ, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे, राम कुंभार, प्रविण कोठावळे, भगवान माने, अमित सरंजामे इ. उपस्थित होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur