मी सुरक्षित व माझा सहकारी सुरक्षित या भावनाने सुरक्षा पाळा-
देवीदास गोरे
कारखान्यात काम करित असताना सुरक्षा ही सर्वाेच्च काम मानून मी सुरक्षित व माझा सहकारी सुरक्षित या भावानाने काम करा व सुरक्षा पाळा असे प्रतिपादन श्री.देवीदास गोरे -संचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचलनालय, मंुबई यांनी केले. ते वर्तन आधारित सुरक्षा या विषयावर आयोजित केलेल्या प्रशिक्षिण व चर्चासत्रात बोलत होते. हा कार्यक्रम सहसंचालक औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय ,कोल्हापूर आणि कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.
आपण ‘‘ शून्य आपघात’’ मानून काम करित आहोत. ज्या घरातील व्यक्ती अपघातात जाते त्या कंुटुंबियांना विचारा सुरक्षा किती महत्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी काय आहे ? कारखाना माझा आहे आणि कारखान्यातील काम करणारा माझा आहे अश्या भावनाने दोघांनीही काम केले पाहिजे. सध्याचा काळ बदलला आहे, कारखान्याची क्षमता पाचपट वाढली आहे, आधूनिक तंत्रज्ञान आले आहे, असे असलेतरी ही सर्व यंत्रणा सुरू व बंद करण्यास मानवाची आवश्यकता असतेच. त्यामुळे संभाव्य धोके बदलले आहे, पुर्वीचे कामगार बांधव आणि आत्ताचे कामगार बांधव यामध्ये मोठा फरक आहे, आत्ताचे कामगार डिप्लोमा होल्डर आहे. आत्ता पर्यंत झालेल्या आपघातांची माहिती घेतल्यास कळते की 90 ते 95 टक्के अपघात हे दोन कारणामुळे झाले आहेत, यामध्ये अनसेफ अॅक्ट आणि अनसेफ कंडिशन. अनसेफ कंडिशन ही त्या कर्मचा-याच्या वर्तनामुळे तयार झाली. सुरक्षेमध्ये सातत्य असणे खूप गरजेचे आहे असेही ते म्हणाले. पुर्वीपेक्षा आता इन्स्पेक्टर राज कमी झाले आहे. आमच्या अधिका-यांनी खुप कारखाने बघितलेले असतात त्यामुळे त्यांना असुरक्षित परिस्थिती बदलण्यास सांगतात. या नंतर सह.संचालक श्री.अभिजीत अवसरे म्हणाले, वर्तन आधारित सुरक्षा या विषया बाबत जास्तीत जास्त जनजागृती करून सर्वांची सुरक्षा पाळणेसाठी आंम्ही मोठया प्रमाणावर काम करित आहोत. सर्वांनी सुरक्षा पाळण्यासाठी सर्व उद्योगांनी कटीबध्द राहावे आणि यामध्ये सातत्य ठेवावे.
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री.दिनेश बुधले यांनी अश्या प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे सुरक्षेच महत्व व अंमलबजावणी करण्यासाठी लोकांची मानसिकता वाढते आणि याचा फायदा सर्वांनाच होतो. त्यामुळे या विभागातर्फे कार्यक्रम घेणे हा स्तुत्य उपक्रम आहे. अश्या प्रकारचे कार्यक्रम सातत्याने घेवून सर्वांची सुरक्षा पाळणेसाठी इंजिनिअरिंग असोसिएशन आणि औद्योगिक सुरक्षा संचालनालय यापुढेही असे विविध कार्यक्रम आयोजित करेल.
कार्यक्रमाची सुरवात श्री.देवीदास गोरे यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करून झाली. यावेळी श्री.गोरेसाहेब यांनी स्वतः लिहीलेले सुरक्षा अभंग यांवेळी सर्वांना ऐकवण्यात आला. तसेच सुरक्षेची शपथ यावेळी सर्वानी घेतली. त्यानंतर सर्व मान्यवरांची पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्री.विकाश- चिफ टर्मिनल मॅनेजर, इंडियन ऑईल कार्पाेरेशन लि., सोलापूर यांनी वर्तन आधारित सुरक्षा या विषयावर सचित्र मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी सुरक्षित वर्तन आणि असुरक्षित वर्तन व धोक अश्या दोन प्रकारच्या वर्तनाची माहिती दिली. वर्तन आधारित सुरक्षेचे प्रशिक्षण देणे, कामाची ठिकाणाची परिस्थिती सुधारणे, सुरक्षा उपकरणांचा वापर करणे, प्रक्रिया व सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करणे, वरील सर्व कामांची वारंवार तपासणी करणे व प्रसंगी संबंधीतांना दंड करणे यासाठी वर्तन आधारित सुरक्षा महत्वाची असलेबाबत श्री.विकास यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात 100 हून अधिक कारखान्यांची 160 सुरक्षा अधिकारी, सुपरवायझर आणि उद्योजक उपस्थित होते. सुत्र संचालन श्री.राज कदम यांनी केले. आभार प्रदर्शन संह संचालक श्री.प्रदीप भिंताडे यांनी केले. प्रशिक्षण पुर्ण केलेल्या उद्योजक, सुरक्षा अधिकारी आणि सुपरवाझर यांनी श्री.गोरेसाहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी सर्वश्री.देवीदास गोरे, अभिजित अवसरे, प्रदीप भिंताडे, दिनेश बुधले, बाबासो कोंडेकर, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी,प्रविण देसाई, सागर शिंदे, स्नेहन भांदिगरे,पांडूरंग पाटील,राज कदम,सचिन पाटील, विकास जाधव.प्रदीप व्हरांबळे.